पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा घालून केली हत्या :, आरोपीला अटक : देवळाली प्रवरा येथील घटना

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

देवळाली प्रवरा : व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीस दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण करून हत्या केल्याची घटना राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंबी स्टोअर परिसरात (दि१६) ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली.

आंबी स्टोअर येथिल बाबासाहेब विठ्ठल गोलवड(वय-३५)हा व्यसनाधीन शुक्रवारी रात्री उशिरा घरी आल्यानंतर पत्नी शितल गोलवड हिच्या दारू पिण्यासाठी मला पैसे अशी मागणी करू लागला. त्यावेळी माझ्याकडे पैसे नाही असे, म्हणून आपल्या जवळील दोन मुलांसमवेत ती झोपण्यासाठी गेली असता, बाबासाहेब यांस पैसे न दिल्याचा राग आल्याने घरासमोर पडलेला लाकडी दांडा हातात घेऊन शितल झोपलेल्या ठिकाणी गेला. डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याने शितलचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी राहूरी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. शितलचा भाऊ विजय एकनाथ बर्डे याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,
दरम्यान, दहातासांच्या आत पोलिसांनी सखोल तपास करत आरोपी बाबासाहेब गोलवड यांस अटक केली आहे.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल आदींनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here