बांधावरून शेतकर्‍यांस माळवाडगावात मारहाण : गुन्हा

माळवाडगाव : श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी लक्ष्मण जयराम शेळके (वय 50 ) हे आरोपी आदिक यांच्या घराजवळील रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जात असताना आरोपी राजेंद्र आप्पासाहेब आदिक, रवींद्र आप्पासाहेब आदिक यांनी बैल गाडी अडवून शेतीच्या बांधाच्या कारणावरून लक्ष्मण शेळके या शेतकऱ्याला शिवीगाळ करतात लाकडी काठीने बेदम मारहाण केली, व धमकी दिली. जखमी लक्ष्मण जयराम शेळके यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र आदिक,रवींद्र आदिक या दोघा भावाविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसांत भा द वि कलम 324,341,323,504,506,34 प्रमाणे गुरनं.524 दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक खान यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल नवनाथ बर्डे पुढील तपास करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here