Gutkha: श्रीरामपुरात पुन्हा एक लाखाचा गुटखा पकडला

दोघांना अटक, एक जण फरार

श्रीरामपूर: तालुक्यातील एकलहरे येथे सुमारे पाऊण कोटींचा गुटखा पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच शहरातील वार्ड 2 मध्ये जवळपास एक लाखाचा गुटखा काल शहर पोलिसांनी पकडला, यामध्ये दोघाजणांना अटक केली असून एक जण फरार आहे.

पोलिसांनी अश्पाक हबीब पठाण वय-42 राहणार -सुभेदार वस्ती वार्ड नं-2 ,

 सरफराज मुस्ताक मेमन वय -28 वर्षे राहणार -सुभेदार वस्ती वॉर्ड नं-2 या दोघांना अटक केली आहे, तर

 आयुब पोपटीया (पूर्ण नाव माहीत नाही ) राहणार- कुरेशी मोहल्ला वार्ड नं-2  – फरार आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील वार्ड 2 मधील गोंधवणी ते मिल्लत नगर कडे जाणाऱ्या रोडवर

एक अशोक लेलँड कंपनीचा पांढरा रंगाचा मालवाहतूक टेम्पो  क्रमांक- एम.एच.06 , बी.जी.0452 असा अवैधरित्या गुटखा /पान मसाला व सुगंधी तंबाखूसह मिळून आला त्यामध्ये असलेला84,528/- रुपयांचा हिरा  पानमसाला विमल पान मसाला व त्यामध्ये मिसळण्यासाठी वापरण्याची रॉयल 717 व वी-1 तंबाखू व त्याची अवैधरीत्या वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली वाहन व मोबाईल असा एकूण 4,05,028/- रुपयांचे मुद्देमालासह मिळून आले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here