भगरीच्या पीठातून अनेकाना विषबाधा

राहूरी तालुक्यात खळबळ; उलड्या, जुलाब आणि पोटदुखीने अनेक नागरिकांना त्रास; राहूरी तालुक्यातील घटना
राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी
देवळाली प्रवरा : कोल्हार खुर्द , राहूरी तालुक्यातील गंगापूर, खळी व मुसळवाडी येथील महिलांना भगरीमुळे विषबाधा झाल्यानंतर आता, राहूरी फॅक्टरी, शेटेवाडी व म्हैसगाव परिसरातील नागरिकांना त्रास झाला आहे. गावातील छोट-छोट्या दुकानदारांना भगर पुरविणार्‍या राहूरी फॅक्टरी येथील होलसेल किराणा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नवरात्र उत्सवास कालपासून सुरुवात झाली आहे.मात्र ’काही’ किराणा दुकांनदारांनी ही संधी समजून भेसळ’युक्त’ भगर, साबूदाणा विक्री सुरू केल्याचे गंभीर प्रकार समोर येत आला आहे. शनिवारी रात्री तीन गावातील 7 ते 8 महिलांना विषबाधा झाल्याने त्यांना लोणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुरी फॅक्टरी वरील ’एका’ होलसेल दुकानातून मुसळवाडी, खळी, गंगापूर गावांमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी भगर नेली होती, ती भगर संबंधित गावातील महिलांनी विकत नेली होती, मात्र रात्री भगर खाल्यानंतर महिलांना त्रास जाणवू लागला, त्यामुळे तत्काळ त्यांना लोणीच्या पीएमटीध्ये दाखल करण्यात आले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here