Kalyan: या रुग्णालयात घटस्थपणेला ‘अवतरल्या नवदुर्गा’

एकाच रुग्णालयात ९ मुलींचा जन्म झाल्याने आश्चर्य

कल्याण: शनिवारचा नवरात्रीचा पहिला दिवस राज्यभर चर्चेचा ठरला तो कल्याण येथील एका रुग्णाल्यामुळे! या रुग्णालयात एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या रुग्णालयात ‘नवदुर्गा अवतारल्या’ची भावना व्यक्त होत आहे.

कल्याणमधील डॉ. अश्विन कक्कर यांच्या रुग्णालयातील ही आश्चर्यकारक घटना. त्यांच्या रुग्णालयात शनिवारी तब्बल 11 महिलांची प्रसूती झाली. ज्यामध्ये 11 पैकी 9 महिलांनी मुलींना जन्म दिला, अशी माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली.

नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म झाला. त्यामूळे जणूकाही 9 जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना कल्याणकरांतून व्यक्त होत आहे. आमच्या रुग्णालयात एकाच दिवशी 11 प्रसूती होणे ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र एकाच दिवशी आणि तेही नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म होणे ही नक्कीच दुर्मिळ आणि आनंदाची बाब असल्याचेही डॉ. कक्कर यांनी सांगितले. या 9 मुलींसह इतर 2 मुलांची आणि त्यांच्या मातांची प्रकृती ठणठणीत असून, नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या 9 मुलींच्या जन्माची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here