Politics: …यामुळे मुख्यमंत्री घरात बसून; शरद पवारांनी केला खुलासा 

Rashtra Sahyadri Breaking…
उस्मानाबाद :
कोरोनाची भीती मनात बाळगून घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच टीका होते. त्यामुळं महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मदतीला धावून आलेत. ‘आमच्या विनंतीमुळेच मुख्यमंत्री घरी राहून कामकाज करत आहेत,’ असं पवारांनी सांगितलं.पवारकाच्या या वक्तव्यामुळं मुख्यमंत्री पवारांच्या सांगण्यावरून घरी राहतात, या विरोधकांच्या टीकेला दुजोरा मिळाला.

करोना लॉकडाऊन काळात विरोधी पक्षाचे नेते व सरकारमधील अन्य मंत्री व नेते राज्यभर फिरत होते. मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र क्वचितच बाहेर दिसले. बहुतेक कामकाज ते घरातूनच करत आहेत. करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या अनेक कोविड सेंटरची उद्घाटने मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन केली. अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी व समाजातील अन्य घटकांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सतत टीकेची झोड उठवली. घरात बसून राहणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना हिणवले गेले. परतीच्या पावसाने राज्यभरात झालेल्या नुकसानीनंतर विरोधकांची टीकेची धार वाढली होती.
आता आजपासून मुख्यमंत्री ठाकरे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घराबाहेर पडले. याचवेळी राज्याचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्याचा दौरा करणार आहेत. ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील जुगलबंदी यानिमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here