दोन्ही पक्षातील वादाच्या भोवऱ्यात पुन्हा शेतकऱ्याचं मरण होईल का ?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत  ते सध्या सोलापुरात दाखल झाले  असून . त्यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी  बकऱण्यास सुरुवात केली आहे  त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संवादही साधला. नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं
.  तसेच  विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपां बद्दल  बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही.  मात्र त्यांच्या  याच वक्तव्यावर  विरोधी पक्षनेते  माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी  केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी  अशी कडवी टीका  केली  त्याच बरोबर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणीही  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली  असून  शरद पवारांवर  आता  सरकारला पाठिशी घालवाण्याची वेळ आली  आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आम्ही दौऱ्यावर  निघे पर्यंत  कुठलाही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकला नव्हता. मात्र आम्ही दौरा करायला निघाल्यावर  सगळेजण आता जनतेच्या भेटीसाठी घराबाहेर पडत  आहे , असे सूचक वक्तव्य यावेळी फडणवीसांनी केलं आहे , तर मग आता राज्य सरकार कडून  शेतकऱ्यांना काय आणि कशी मदत मिळेल ? किंवा या दोन्ही पक्षातील वादाच्या भोवऱ्यात पुन्हा शेतकऱ्याचं मरण होईल का ? हे  पाहणंही तितकच  महत्वाचं ठरणार आहे 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here