ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक प्रवरानदीत कोसळला

नशिबाने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही : महिला व पुरूष किरकोळ जखमी

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

बेलापूर : (किशोर कदम) ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक प्रवरानदीत कोसळल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील जुन्या पुलावरून ट्रक कोसळली आहे.
‘सुदैवाने’ कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, चार महिले’सह’ पाच पुरूष अपघातात जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्थानिकाकडून समजली सविस्तर माहिती अशी की, MH – 04 fp 6691हा लेबर वाहतुक करणारा ट्रक अकोले येथील अगस्ती कारखाना येथून लेबर घेऊन राहुरी फॅक्टरी येथिल कारखान्याकडे जात असताना पहाटे सुमारास समोर येणाऱ्या इंडिका चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने लेबर वाहतुक करणारा ट्रक कठडे तोडून प्रवरा नदीपात्रात कोसळला.
अपघातात सुदैवाने ड्रायव्हर व किनरला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या ट्रक मध्ये १० ते १२ महिला व पुरुष ऊसतोड कामगार होते.
त्यांना साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातग्रस्त ट्रक हा दहाव्या ओठ्याशेजारीच कोसळल्यामुळे ‘नशीबने’ ऊसतोड कामगार या अपघातात थोडक्यात बचावले.
सोमवारी सकाळच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजली आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here