भगरीतून विषबाधेची राहुरी पाठोपाठ दुसरी घटना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कर्जत : चापडगाव (ता.कर्जत) येथे उपवासाची भगर अथवा त्याचे ‘पीठ’ खाल्यामुळे जवळपास ३५ ते ४० लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वृक्षवल्ली समूहाचे विकास शिंदे यांनी दिली. त्यामुळे चापडगाव येथील नागरिकांनी उपवासाची भगर अथवा त्याचे पीठ खाऊ नये, असे आवाहन अॅड शिंदे यांनी केले आहे.

‘काल’पासून नवरात्री उत्सव सुरू झाला असून, अनेक नागरीक या काळात कडक उपवास पाळत असतात. याच अनुषंगाने चापडगाव ता कर्जत येथील अनेकांनी नवरात्रीचे उपवास पाळले आहेत. उपवासासाठी लागणारी भगर आणि त्याचे पीठ खाल्याने येथील ३५ ते ४० लोकांना विषबाधा झाली असून वरील लोकांना जुलाब आणि उलट्याचा त्रास होत असल्याची माहिती चापडगाव येथील वृक्षवल्ली समूहाचे अॅड विकास शिंदे यांनी दैनिक राष्ट्र’ सह्याद्री’शी बोलताना सांगितले. सदर लोकांवर चापडगाव येथेच उपचार करण्यात येत आहे. संध्याकाळी चापडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांनी भगर अथवा त्याचे पीठ याचे सेवन करू नये, तसेच उलटी आणि जुलाब होण्याचा त्रास कोणा नागरिकास होत असल्यास त्यांनी वेळीच योग्य उपचार घ्यावे असे आवाहन केले आहे. यावेळी आमच्या प्रतिनिधीने चापडगावचे वैद्यकीय डॉ आकाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विषबाधेच्या घटनेला दुजोरा दिला असून, नागरिकांना उलटी, अशक्तपणा आणि जुलाब होत असल्याची माहिती दिली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here