एकाच ट्रकची त्याच चोरट्याने केली  दुसऱ्यांदा चोरी  

नागपुर :   एका चोरट्याने एकाच ट्रकची दोनदा चोरी केल्याची घटना नागपूर शहरात घडली आहे. त्यामुळे  चोरट्यांकडून  नागपूर पोलिसांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. चोरट्याने छोटी मोठी वस्तू नाही तर तब्बल 20 टन लोखंडानी भरलेले  भले मोठे ट्रक चक्क  पोलीस स्टेशन समोरून चोरून नेले आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे पोलिसांनी जे ट्रक पोलीस स्टेशन समोर उभे केले होते आणि ज्याचा कडून ते ट्रक पकडले होते  त्यानेच तो  ट्रक पुन्हा एकदा चोरून  नेला  आहे. 9 ऑक्टोबरला  सुमित पोद्दार या लोखंड व्यापाऱ्याचा 20 टन लोखंडाने लादलेला  ट्रक लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुष्करणा भवन समोरून चोरीला गेला होता. लाखोंचा मुद्देमाल भर रस्त्यातून चोरीला गेल्यामुळे पोलिसांनी चारही दिशेने पथक रवाना केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शीवरून ते ट्रक जप्त करून संजय ढोणे नावाच्या आरोपीला अटक करून जप्त केलेले ट्रक आणि आरोपी लकडगंज पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले होते. मात्र  याच चोराकडून आणखी  काही  मुद्देमाल जप्त करायचेय  असे सांगून पोलिसांनी जप्त केलेले  ट्रक व्यापाऱ्याला परत केले नव्हते. मात्र आरोपीला काही काळातच न्यायालयातून  जामीन मिळाला आणि त्याने आज पहाटे लकडगंज पोलीस स्टेशनच्या अगदी समोर उभा असलेला तोच ट्रक पोलिसांच्या ताब्यातून पुन्हा पळवून नेलाय .  आणि आता पुन्हा पोलीस संजय ढोणेच्या शोधात आहेत.
          मात्र,चोरट्याने पुन्हा तेच ट्रक पोलीस स्टेशनच्या समोरुन आणि  पोलिसांच्या ताब्यातून चोरून नेल्यामुळे नागपूरात चोरटे आणि गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे हे  दिसतेय .त्यामुळे  आता नागपूर पोलीसांनी  चोरट्याला लवकरात लवकर  जेरबंद करणार असल्याचे स्पष्ट केलाय तर नागपुरात पुन्हा असले प्रकार घडणार नाही यासाठी नागपूर पोलीस  नेमकं काय दखल घेतील याकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here