beggar: नेवासा आणि फाटा बनतोय अल्पवयीन भिकारी व वेड्यांच केन्द्रस्थान… तृतीयपंथीयांची त्यात आणखी भर..

व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट

ज्ञानेश्वर सिन्नरकर। हंडी निमगाव
: नेवासा शहरामध्ये व परिसरात लॉक डाउनच्या काळात शेवगांव रोडच्या कडेला पाचपन्नास भटके कुटुंब रहायला आली, त्यांना कोणीही हरकत घेतली नाही. नगरपालिका, महसूल, पोलीस या पैकी कोणीही त्यांना विरोध केला नाही. त्यात उत्पनाचे काही साधन नसल्याने *पाच ते दहा वर्षांच्या मुलामुलींना शहरातील बाजारपेठ तसेच नेवासा फाटा परिसरामध्ये दिवसभर भीक मागायला लावून त्यांचा जीव धोक्यात घालुन दिवसाकाठी दोनशे ते पाचशे रुपये गोळा करायचे आणि संध्याकाळी त्यांच्या कुटुंबातील मोठी माणसं व्यसन करताना आता दिसतात. दर दहा पाच मिनिटाला येणाऱ्या या लहान मुलांना किती वेळा आणि किती पैसे द्यायची हा प्रश्न छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना पडलाय. विशेष करून बसस्थानक चौक, अंबेडकर चौक, राजमुद्रा चौक आदी भागात अचानक संख्या वाढल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शहरवासीय यांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरवात केली आहे. या कुटुंबातील काही लोकांकडे शहरातील रहिवासी आणि मतदान ओळखपत्र असल्याचीही चर्चा आहे. या बोगस भिकाऱ्यांचा बंदोबस्त कोण करणार? त्यांच्यामुळे खरे गरजवंत वर्षनुवर्षे शहरातील भिकाऱ्यांची उपेक्षा आणि उपासमार होऊन राहिली आहे. तसेच भरीतभर मुकिदपुर ( नेवासा फाटा ) परिसरात वेडयांची संख्या  दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे.  तसेच दिवसाआड येनाऱ्या तृतीयपंथीयांनादेखील व्यापारी तसेच प्रवासीदेखील वैतागले आहेत.  या सगळ्यांचा कोण कसा बंदोबस्त करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेवासा नगरपंचायत आणि मुकिन्दपुर ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनने यात लक्ष घालून व्यापारीवर्गाला न्याय द्यावा.-विजय दहिवाळकर(सराफ), नेवासा फाटा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here