अपघातात ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी 
श्रीरामपूर : शहरातील नेवासा रोडवर असलेल्या  सायली बुक स्टॉल समोर रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या वृद्धाला भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. यात त्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघात झाल्यानंतर चालक फरार झाला आहे. 
साहेबराव बाबुराव शिंदे( वय ७० ) रा.सरस्वती कॉलनी श्रीरामपूर असे अपघातात मयत झालेल्या वृद्धांचे नाव आहे.  धडक इतकी जोरात होती की, साहेबराव बाबुराव शिंदे हे जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर चालकाने माणुसकीही नदाखवता तेथून पळ काढला.  भर दुपारी दीड वाजता हा  भीषण अपघात झाला होता.  पोलीस नाईक रविंद्र कोरडे यांच्या फिर्यादीवरून फरार चारचाकी गाडी चालकांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात  भांदवि कलम 304 (अ),279 337 338 मोटार वाहन कायदा कलम 184 134 (अ )(ब )177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक परदेशी हे पुढील तपास करत आहे

5 COMMENTS

  1. Nice post. I be taught something more challenging on different blogs everyday. It would at all times be stimulating to read content material from different writers and follow somewhat something from their store. I’d favor to make use of some with the content on my weblog whether or not you don’t mind. Natually I’ll offer you a link on your net blog. Thanks for sharing.

  2. Great info and right to the point. I don’t know if this is actually the best place to ask but do you guys have any ideea where to employ some professional writers? Thanks 🙂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here