श्रीगोंदा दस्ताभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ,सर्व सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट

 राष्ट्र सह्याद्री , प्रतिनिधी  
 श्रीगोंदा ;- श्रीगोंदा तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रेकार्ड रूम  मध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरु आहे.  मात्र या अनागोंदी कारभाराचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत असल्यामुळे किरकोळ कामासाठी नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत.  त्यामुळे खुद्द तहसीलदार यांनी लक्ष घालावे अशी मागणी सर्व सामान्य नागरीकातून होताना दिसत आहे.  श्रीगोंदा तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना सोसायटी पीक कर्ज मिळण्यासाठी जुने सातबारे तसेच फेरफार याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते.  त्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिक तहसील कार्यालयाच्या रेकार्ड रूम मध्ये येतात.  त्यांना सुरवातीला राजकारण्यकडे जाण्याचा  सल्ला दिला जातो.  त्यानंतर त्या अर्जावर बिनहिशोबी रक्कम त्याचेकडून वसूल करून त्यांना काही दिवसानानंतरची तारीख दिली जाते.  बिचारा अर्जदार दिलेल्या तारखेला फेरफार नेण्यासाठी रेकार्ड रूम मध्ये येतात त्यावेळी त्यांना सांगितले जाते की  समोर लटकवलेल्या यादीत आपले नाव आहे का शोधा परंतु शेतकऱ्याला त्या यादीत आपले नाव सापडत नाही.  त्यावेळी त्यांना परत दोन दिवसांनी चक्कर मारा असे सांगितले जाते.  सरकारी किमतीपेक्षा आगाऊ रक्कम स्वीकारूनही सर्व सामान्य शेतकऱ्यांना आपापले दस्तावेज मिळत नाहीत.  मात्र रेकार्ड रूम मध्ये काम करणाऱ्या लोकांना चेरी मेरी दिली का तात्काळ कागदपत्रे उपलब्ध होतात असे काहीसे चित्र आहे.  मागील काही दिवसापासून रेकार्ड रूम बंद ठेवण्यात आले होते आणि आजतागायत ते वेळेवर सुरु होत नसल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत असेच चित्र  पाहण्यास मिळत आहे. रेकार्ड रूम तात्काळ उघडा – तहसीलदार श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेकार्ड रम बंद का आहे.  याबाबात तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले रेकार्ड रूम का बंद आहे याबाबत त्यांनी संबंधित कर्मचारी याना बोलावून घेऊन रेकार्ड रूम बंद असल्यामुळे  लोकांच्या अनेक अडचणी होत आहेत ते तात्काळ उघडा असा आदेश तहसीलदार पवार यांनी दिल्यावर काही काळातच  रेकार्ड रूम सुरु झाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here