Bihar Election: बिहार निवडणुकीच्या निरीक्षक पदासाठी काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची निवड!

महेश धानके। राष्ट्र सह्याद्री

शहापुर :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

यासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व बिहार निवडणुकीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खासदार रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मोहनप्रकाश यांनी मोरे याना दूरध्वनीवरून कळविले.
बिहार मधील ३८ जिल्ह्यातील निवडणुकीसाठी देशाच्या विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून मोरे यांच्यासह राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजयजी वडेट्टीवार, नामदेव उसेंडी(गडचिरोली), राजाराम पानगव्हाणे (नाशिक), सुनिल शिंदे (पुणे), यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत.

पक्षाच्या “वार रूम”च्या सूचनेनुसार या सर्व पदाधिकाऱ्यांची (दि. २० ऑक्टोबर) सदाकत आश्रम, पाटणा येथील बिहार प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक आहे. त्यासाठी मोरे त्यांचे सहकारी प्रदेश सरचिटणीस रवींद्र परटोळे यांच्यासह बिहारला रवाना झाले.
पक्षाने विश्वासाने दिलेल्या जबाबदारीबद्दल प्रमोद मोरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

4 COMMENTS

  1. Good website! I really love how it is simple on my eyes and the data are well written. I am wondering how I could be notified whenever a new post has been made. I have subscribed to your RSS feed which must do the trick! Have a nice day!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here