मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात पाठपुरावा करू ः ना. शंकरराव गडाख

नेवासात मुस्लिम समाजाच्या वतीने ना. गडाखाना दिले निवेदन
नेवासा : मुस्लीम समाजाची राजकीय,शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत मागास झाल्याने मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावे म्हणून नेवासा येथील मुस्लीम समाजाच्या वतीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांना निवेदन देण्यात आले, व आरक्षणासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करावा यासाठी साकडे घालण्यात आले. मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासन दरबारी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी नामदार शंकरराव गडाख यांनी मुस्लीम समाज बांधवांशी बोलताना दिली.
यावेळी मुस्लिम समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान,रहेमानभाई पिंजारी,जुम्माखान पठाण,बाबरखान पठाण,अब्दुल्ला बागवान,जातीय सलोखा समितीचे सदस्य आसिफभाई पठाण,अँड.जावेदभाई ईनामदार, अल्ताफ पठाण,अँड.के.एच.पठाण,हारूणभाई जहागिरदार,सुलेमान मणियार,शोएब पठाण, युसूफभाई बागवान,इनूसभाई नाईकवाडे,जाविद शेख, रियाज शेख,सोनू जहागिरदार, शहबाज पठाण,समीर सय्यद, जम्माभाई पटेल,अज्जूभाई पठाण,एजाज खान पठाण, आवेज पठाण,रियाज पठाण उपस्थित होते.
मुस्लीम समाजाच्या आरक्षण संदर्भात शासन दरबारी सरकार देखील सकारात्मक असून त्यासाठी आपण ही पाठपुरावा करू अशी ग्वाही नामदार शंकरराव गडाख यांनी मुस्लीम शिष्टमंडळाशी बोलताना दिली.

मुस्लीम समाजाच्या नियोजित शादीखान्यासाठी याआधी नगरपंचायतला मंजूर झालेला निधी हा मुदती अभावी परत जाणार होता. मात्र तो निधी जाऊ नये म्हणून आपण पाठपुरावा केला व निधीची मुदत वाढवून घेतली अशी माहिती नामदार गडाख यांनी दिल्यानंतर मुस्लीम समाजाच्या वतीने निधीची मुदत वाढवून दिल्याबद्दल नामदार गडाख यांचे यावेळी आभार मानून धन्यवाद ही देण्यात आले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here