बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी भिगवण,
 बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक करून एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी, दादासो रामचंद्र दराडे व महादेव चंद्रकांत दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे.
 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार , भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक  निरीक्षक जीवन माने यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार अकोले येथील गणपती मंदिरासमोरील रोडवर सदर आरोपी आपल्या ताबेतील मारुती सुझुकी एस क्रॉस MH 42 AS 0008(दि.२० रोजी)  हिचे मधून गावठी पिस्तूल जवळ बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती. यावरून भिगवण पोलीसांनी सापळा रचून सदर आरोपी व त्यांच्या कडील एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे किं.रु. ५,५०,८०० चा मुद्देमाल हस्तगत केला‌. तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला  सापळा रचून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. या कारवाईमुळे या भागातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
 ही कामगिरी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार नाना वीर, पोलीस नाईक गोरख पवार, इन्कलाब पठाण यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here