नेहरू युवा केंद्र पुणे व हरित मित्रपरिवाराकडून  मोफत ‘बीज’ वाटप

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी  
पुरंदर/जेजुरी  
       नेहरू युवा केंद्र संघटन व हरित मित्र परिवार डॉ. महेंद्र घागरे यांनी  पुरंदर तालुक्यातील सासवड येथे तहसीलदार कचेरी, सासवड पोलिस स्टेशन, पंचायत समिती पुरंदर येथील अधिकारी व इतर लोकांना मिळुन एकुण 238 लोकांना 2 हजार बीजांचे या मध्ये रक्त चंदन व खैर या सारख्या देशी झाडांचे बीज मोफत वाटण्यात आले तसेच मार्गदर्शन करण्यात आले.       या मध्ये बीज कसे लावायचे, त्याची निगा कशी राखायची, निसर्गाची काळजी आदी विषयांवर डॉ. महेंद्र घागरे यांनी मार्गदर्शन  केले  व बाळासाहेब ढमाले म्हणाले की ,प्रत्येक वेळेस शासनावर प्रशासनावर अवलंबुन राहु नये समाजाने  जबाबदारी उचलावी तसेच त्यांनी सांगितले की , आपल्या शेतामध्ये दहा पाच एकरा मध्ये जमिन करायला आपल्याला किती अडचनी येतात तेच शासनाने व प्रशासनाने आपल्या गावातील सेवा करायची आणि वेळेवर काम न झाल्यामुळे ते अपेक्षित यश मिळत  नाही. आपण मुलांच्या श्रम दानातुन हे काम कराव हे कस व्यवस्थित करता येईल त्याचा विचार करावा या कार्यक्रमास सासवड पोलिस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला.     हि मोहिम संपुर्ण पुरंदर तालुक्यातील शाळा, कॉलेज, युवक व युवती मंडळे यांच्या माध्यमातुन मोफत राबविण्यात येणार  आहे. आत्तापर्यंत हरित मिञ परिवाराने 55 लाख बीज व रोपांची लागवड केली आहे. गेल्या 15 वर्षा पासुन हा वसा  राबवत आहे.       आज पुरंदर मध्ये हरीत मिञ परिवार चे संस्थापक डॉ. महेंद्र घागरे, अध्यक्ष बाळासाहेब ढमाले, नेहरु युवा केंद्र संगठन पुणे चे प्रतिनिधि स्वप्नील शिदे यांनी नेहरु युवा केंद्र पुणे जिल्हा युवक कल्याण अधिकारी यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित केला होता.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here