तहसील कार्यालयाचा मनमानी कारभार जुन्या दस्तऐवजासाठीजनतेला धरले जातेय वेठीस

 राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी 
श्रीगोंदा तहसिलदार यांचा मनमानी कारभार
जुन्या दस्तऐवजासाठी जनतेला धरले जातेय वेठीसश्रीगोंदा : तहसिल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अभिलेख कक्षात गेली अनेक दिवसांपासून जुने दस्तऐवज मिळण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याच्या मथळ्याखाली मराठी दैनिकातून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर तहसिलदार यांनी तब्बल आठ दिवस कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचा आदेश पारित केला असल्यामुळे जनतेच्या अडचणीमध्ये अजूनच वाढ झाली आहे. त्यामुळे श्रीगोंदा तहसिलदार यांच्या मनमानी कारभाराचा फटका सारावासामान्य जनतेला बसतोय असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
सध्या सोसायटीचे मध्यम मुदत, दीर्घ मुदत, शेळी, गायी अशी विविध प्रकारची कर्ज वाटप योजना सुरु असून या सर्व योजनासाठी तहसिल कार्यालयाच्या अभिलेख कक्षातून जुने फेरफार तसेच जुने सातबारे, जन्म-मृत्युच्या नोंदी, रस्ता वाहिवाटी केसेस तसेच इतर नक्कला मिळविण्यासाठी श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागातून सर्वसामान्य नागरिक श्रीगोंदा तहसिल कार्यालयात येत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून हे सर्व दस्तऐवज मिळविण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याच्या मथळ्याखाली अनेक दैनिकातून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर श्रीगोंदा तहसिलदार प्रदीपकुमार पवार यांनी मनमानी कारभार करत एक आदेश पारित केला आहे, त्या आदेशानुसार अजून आठ दिवस अभिलेख कक्षात कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या नक्कलाही उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून यास जबाबदार कोण?
यामुळे नागरिकांच्या अडचणीमध्ये अजूनच जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. तरीही तहसिलदार हे लोकसेवक असल्याचा विसर त्यांना पडलेला दिसतोय अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे. तरी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालय अशा अनेक ठिकाणी दाद मागणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.           
श्रीगोंदा तहसिल कार्यालयामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाताखाली स्टेफनी ठेवली जात असल्यामुळे एका सुजाण नागरिकाने या सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून टाकण्यात यावे यासाठी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण केले होते. मात्र त्यानंतर फक्त अभिलेख कक्षातील एकच खाजगी कर्मचारी काढण्यात आला. मात्र जमीन संकलन, कुळकायदा, फौजदारी, निवडणूक, पुरवठा विभाग याठिकाणी अजूनही खाजगी कर्मचारी कार्यरत आहेत. मग एकाच ठिकाणचा खाजगी कर्मचारी काढून तहसिलदार यांनी नेमके काय सार्थ केले आहे? असा सवाल उपोषणकर्ते निलेश शेलार यांनी विचारला असून याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here