लवकरच बंद होणार 100 नंबरची सेवा

पुणे : पोलिसांचे संपर्क करण्यासाठी वापरण्यात येणार आहे 100 हा नंबर आता बंद होणार आहे.  100 क्रमांक अनेक वर्षांपासून पोलीस कार्यालयात सेवेसाठी वापरला जातो. कोणीही शंभर नंबर दाबल्यावर त्याला ताबडतोब पोलिसांची सेवा मिळत असे. पूर्ण भारतभरातील एकूण 20 राज्यांमध्ये 100 हा नंबर पोलीस खात्याशी संपर्कासाठी  वापरण्यात येतो.पण मोबाइल नेटवर्कच्या 2g , 3g प्रमाणे पोलिसांशी संपर्कासाठी वापरण्यात येणारा 100 हा नंबर इतिहासजमा होणार आहे. लवकरच 100 ऐवजी 112 हा क्रमांक सर्व आपत्कालीन सेवेसाठी मदतीला उपलब्ध होणार आहे.  या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यात या एकाच क्रमांकावरून मदत मिळणार आहे.
 सध्या राज्यात पोलिस संपर्कासाठी 100, अग्निशामक देण्यासाठी 101, व महिला हेल्पलाइन साठी 1090 हे क्रमांक वापरण्यात येत आहेत परंतु लवकरच हे सर्व नंबर बदलून त्याच्याऐवजी 112 हा एकच क्रमांक उपलब्ध राहणार आहे

डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून राज्यात अस्तित्वात येणार आहे. देशातील २० राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक स्वीकारला असल्याची माहिती आहे. यामध्ये मागच्या वर्षी सर्वप्रथम उत्तर प्रदेश सरकारने १०० क्रमांकाऐवजी ११२ नंबरचा वापर हेल्पलाईन म्हणून सुरु केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या क्रमांकांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहे.

‘११२’ या एकाच क्रमांकाद्वारे सर्व प्रकारची मदत संकटात सापडलेल्या व्यक्तीला मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यामध्ये ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून अस्तित्वात आणला जावा यादृष्टीने तयारी सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व नोडल ऑफिसर सेंट्लाईज हेल्पलाईन सिस्टीमचे एस जगन्नाथ यांनी दिली आहे.

आपत्कालीन प्रसंगी जर कुणी ११२ क्रमांकावरून संपर्क साधल्यास तात्काळ आणि एकाच वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना संबंधित क्रमांकाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून या यंत्रणेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here