२ दिवसात अल्पवयीन मुलीचा शोध लावा; पोलिस अधिकार्‍यांना नातेवाईकांचा घेरावा 

अन्यथा अशोकनगर फाटा येथे रस्तारोको करण्याचा इशारा*

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

श्रीरामपूर : तालुक्यातील भेर्डापूर येथून चार दिवसापूर्वी अज्ञात इसमाने ‘एका’ १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळून नेल्याची घटना १८ आॅक्टोबर रोजी घडली होती :, सदरच्या घटने संदर्भात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा दाखल होऊन ४ उलटून देखील पळून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक न केल्याने, तसेच पोलिसांचा तपास हा संशयरित्या चालू असल्याचा आरोप करत भेर्डापूर, अशोकनगर, मांलूजा, कारेगाव, श्रीरामपूर परिसरातील लोकांनी भेर्डापूर येथील पीडित कुटुंबासमवेत तालुक्यातील विविध राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यासह जमावाने तालुका पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याना घेरावा घातला.

संतप्त जमावाच्या भावना आक्रोश पाहता डिवाय एसपी यांनी राहूल मदने मध्यस्थी घालून, येत्या २ दिवसात आरोपीचा शोध लावण्याचे आश्वासन दिले, मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना २ दिवसाचा कालावधी देत शोध लावावा, जर आरोपीला अटक न झाल्यास अशोकनगर फाटा येथे रस्तारोको करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.

या आंदोलनावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, सुनिल मुथ्या, उपनगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समितीच्या सदस्या वंदना मुरकुटे, सुभाष पटारे, कैलास पटारे, महेंद्र पटारे, आदीसह उपस्थित होते.

7 COMMENTS

  1. You really make it seem so easy together with your presentation however I to find this matter to be actually something that I feel I would by no means understand. It sort of feels too complex and extremely vast for me. I am having a look ahead to your next publish, I?¦ll try to get the hang of it!

  2. I would like to thnkx for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing abilities has inspired me to get my own blog now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here