चोरून लग्न तुम्ही करता आणि बापाला संसार चालवायला लावता, अशी कशी अपेक्षा करता?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या नुकसान ग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा सुरू झाल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. विरोधी पक्ष देखील राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांना केंद्र सरकारने मदत द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चोरून लग्न तुम्ही करता आणि बापाला संसार चालवला लावता, अशी कशी अपेक्षा करता? अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे

आता प्रमाणेच गेल्यावर्षीही ठाकरेंनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे बाजूला ठेवून मदतीची मागणी सरकारकडे केली होती. त्यामुळे आता ठाकरे सरकार पंचनामे करायला वेळ का घालवत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत जाहीर करायला हवी अशी मागणीही रावसाहेब दानवे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here