केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्यालाच दिवाळी

मुंबई : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस मंजूर केला आहे. याचा लाभ केंद्रातील ३० लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

तसेच २०१९-२० मधील हा दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला असून, तो लगेचच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. याचा फायदा ३० लाख गैर- राजपत्रित कर्मचाऱ्यांना होणार आहे. हा बोनस तब्बल ३,७३७ कोटी एवढा आहे. एका पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी ही घोषणा केली.

बोनसची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे वळती केली जाणार आहे. तसेच हा बोनस विजयादशमीच्या आधीच दिला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या 30 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच जम्मू-काश्मिरमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेलाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे तिथे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या धर्तीवर निवडणुका होणार आहेत, असे जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले.

निर्मला सीतारामन यांनाही दिली ऑफर

अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना LTC कॅश व्हाऊचर आणि फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू करण्यात आली आहे.

हे व्हाऊचर कर्मचारी बाजारात खर्च करू शकणार आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. या स्कीमचा लाभ पीएसयू आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

एलटीसीच्या बदल्यातील नकदी व्यवहार डिजिटल करता येणार आहे. हा एलटीसी 2018-21 या काळातील असणार आहे. याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे. यासाठी कर्मचाऱ्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा. याचप्रकारे एखाद्या जीएसटी नोंद असलेल्या दुकानदाराकडून सामान डिजिटल पेमेंटने खरेदी केल्यास लाभ मिळणार आहे. अशाप्रकारे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खर्च करण्यामुळे 28 हजार कोटी रुपयांची रक्कम अर्थव्यवस्थेत जमा होईल , असे सीतारामण यांनी सांगितले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here