Crime Breaking: दोन गावठी कट्टा सह दोघाना अटक…

संगमनेरमध्ये अटक; आरोपी नेवशाचे

विकास वाव्हळ। राष्ट्र सह्याद्री

संगमनेर:

संगमनेर खुर्द परिसरात संगमनेर शहर पोलिसांनी काल रात्री गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे व 97 हजाराचा मुद्देमाला सह दोघाना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संगमनेर मध्ये मात्र खळबळ माजली, असून शहर पोलीसांनी अधिक सखोल तपास करून या मागील सुत्रधाराला व टोळीला ताब्यात द्यावे.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पृथ्वीराज उर्फ देवा आबासाहेब देशमुख (वय 22) आणि किरण विजय दळवी (वय 24, दोघे रा. शिरसगाव ता. नेवासा) यांना अटक केली आहे. या दोघा कडून
25 हजार रुपये किंमतीचे दोन्ही बाजूला प्लास्टिकची मूठ बसवलेली, पांढऱ्या धातूचा गावठी बनावटीची पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे तसेच 50 हजार किमतीची विना नंबरची बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॅटिना दुचाकी गाडी, 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मिळालेल्या  माहितीनुसार काल (बुधवारी ता.21) रात्री साडेनऊच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पथकाने रायतेवाडी शिवारात सापळा लावला, त्यावेळी जून्या पुणे-नाशिक महामार्गाने झोळे टोलनाक्याच्या दिशेने  विना क्रमांकाची दुचाकी व दोघेजण येत असल्याचे पथकाला दिसले. या दुचाकी स्वरांना  थांबून त्यांची अंगझडती घेतली त्यात दुचाकी चालकाच्या कंबरेला गावठी पिस्तुलात दोन जीवंत काडतूसे असल्याचेहीे दिसून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.असून गुन्हा दाखल केला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. ए. माळी हे करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here