Corruption: सहआरोपी न करण्यासाठी 50 हजार..!

पोलीस उप निरीक्षक लाचलुचपतच्या सापळ्यात

औरंगाबाद : तक्रारदाराला सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी 50 हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उप निरीक्षक संतोष रामदास पाटे (वय 30, रा पडेगाव औरंगाबाद) याला लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने सापळा लावून रंगेहात जेरबंद केले.

पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. अनिता जमादार, पोलीस उप अधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here