उक्कलगावात बिबटयाचा धुमाकूळ सुरुच : तुपे वस्ती’नजीक’ सापडले ताजे ठसे

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी 

      उक्कलगाव : (वार्ताहर): ग्रामीण भागात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला आहे.  प्रवरा परिसरात बिबटयाचा वावर वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील धनवाट परीसरात तुपे वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.       
परिसरात कापूस वेचणीचे काम सध्या शेतात सुरू आहे. शेतकर्‍यांसह मोलमजूरी करणारे कामगार कापूस वेचणी करत आहे. शेतात दिवाळीपर्व कामाची लगबग सुरू असतानाच बिबटयाने चांगलाच धुमाकुळ परिसरात घातला आहे.धनवाट परिसरातीलच तुपे वस्तीनजीकच बिबटयाचा वावर वाढला आहे. येथीलच बिबटयाचे ताजे ठसे सापडले असल्याने तुपे वस्तीवर शेतकरी चांगलाचे धास्तावले आहेत .  
 येथीलच चंद्रशेखर पावसे यांच्या शेडजवळ बिबटयाचे ठसे सापडले असून, त्यांच्या शेडच्या जाळीचे पक्के बांधकाम असल्यामूळे बिबट्याला जाळीत प्रवेश करत आला नाही. ‘नव्हे’ तर     बिबट्याने शेळी किंवा गायांवर हल्ला केला असता या हल्ल्यातून थोडक्यात जनावरे बचावले अशी  प्रतिक्रिया शेतकरी चंद्रशेखर पावसे यांनी दिली. लम्हाणबाबा शिवारात व धनवाट परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यामूळे येथे पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी चंद्रशेखर पावसे, भारत निवृत्ती थोरात, बाबासाहेब तांबे आदी सह शेतकर्‍यांनी वनविभागाकडे केली आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here