Braking:  कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका 


अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांची अ‍ॅंजिआोप्लास्टी झाल्याची माहीती मिळाली आहे.कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. हे भारताच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून, त्यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला.

कपिल देव यांची कारकीर्द

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here