Containment: ‘छावणी परिसरातील अवैध प्रकार थांबवा’

आमदार अनिल बेनके यांच्या सुचनेनंतर ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्याकडून आवश्यक सूचना, कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा संपन्न…

बेळगाव / प्रतिनिधी

कॅंटोनमेंट बोर्डाची ( छावणी परिषद) सर्वसाधारण सभा मंगळवारी परिषदेच्या सभागृहात पार पडली. छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यासह परिषदेचे सदस्य, अधिकारी वर्ग बैठकीस उपस्थित होते.

आमदार अनिल बेनके यांनी जुने किल्ला भाजी मार्केट येथील बंद पडलेल्या दुकानातून अवैद्य प्रकारांना ऊत आल्याचे सांगितले, याबरोबरच छावणी परिषदेच्या विविध भागात सुरू असणाऱ्या अवैध प्रकारावर तात्काळ रोख लावण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली. गोगटे सर्कल जवळ असणाऱ्या जागेचा वापरही अवैद्य कामासाठी होत असल्याचे यावेळी आमदार अनिल बेनके यांनी निदर्शनास आणून दिले, तर कॅम्प येथील आर. एल. लाईन वरील देवीच्या मंदिराला जाण्यासाठी रस्ता खुला करण्याची मागणी केली. यावर अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी आवश्यक सूचना केल्या.
परिषदेचे सीईओ वर्चस्व यांनीही काही मुद्दे मांडले तर सदस्य डॉ. मदन डोंगरे व अन्य सदस्यांनीही विचार मांडले. बैठकीनंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कचरा उचलीसाठी नव्याने मंजूर झालेल्या वाहनांचा कार्यारंभ करण्यात आला. आमदार अनिल बेनके आणि परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या हस्ते या वाहनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिषद उपाध्यक्ष निरंजना अष्टेकर यांच्यासह सदस्य डॉ मदन डोंगरे, विक्रम पुरोहित, अबिदा धारवाडकर, साजिद शेख आदी सदस्य उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here