देवेंद्र फडणवीस यांना कोरोना ची लागण

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून क्वारंटाईन होत असल्याचं फडणवीस यांनी ट्विटर द्वारे सांगितलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच कोरोनाची साथ आल्यापासून मी दिवसरात्र काम करतो आहे. मात्र आता मी ब्रेक घ्यावा असं देवाला वाटत असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांनी स्वतःला घरामध्ये आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. शिवाय माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी असे त्यांनी ट्विटरवर सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here