विनायक दादा पाटील यांचे निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नाशिक:  ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आणि साहित्यिक  विनायक दादा पाटील  यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना परवाना झाला होता त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते त्यातून बरी होऊन ते नुकतेच घरी पोहोचले होते परंतु त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या राजकीय काळात त्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले होते. विनायक दादा पाटील चे नेते मंत्री लेखक आणि साहित्यिक देखील होते त्यांच्या अनेक साहित्यिकांना वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते. त्यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या पुस्तकाला राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कारही देण्यात आला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here