पुणेकरांना मिळणार आता पाच रुपयात बसचा प्रवास

पुणे :  पुणे तिथे काय उणे या म्हणी प्रमाणे पुणेकरांना मिळणार आहे पाच रुपयात पाच किलोमीटरपर्यंत बसचा प्रवास मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी मिळून अटल प्रवास योजनेची सुरुवात केली आहे. या दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीसाठी बसेस चा वापर होतो. बस मधून प्रवास करताना पहिल्या पाच किलोमीटर साठी प्रवाशांना फक्त पाच रुपये मोजावे लागणार आहेत. तर ही योजना राबविण्यात यावी यासाठी पी एम पी एम एल च्या स्पेशल बसेसच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

एअरपोर्टला ने-आण करण्यासाठी पीएमपीएल बसेस तसेच एसी बसेस सेवा सुरू करण्यात आली आहे. स्पेशल बसेस मधून पुढे अधिक पैसे मोजावे लागतील आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सर्वसामान्य प्रवाशांना पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. आज या अटल योजनेचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्वस्त प्रवास योजनेचा अधिकाधिक नागरिकांना फायदा व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांमधील सर्व प्रमुख रस्त्यांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. तसेच कालांतराने सुरू होणारी मेट्रो ट्रेन यामुळे देखील मेट्रोला पूरक अशी सेवा करण्यात यावी यासाठी ही योजना अमलात आणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here