काळ्याबाजारात विक्रीसाठी चाललेला 24 टन धान्यसाठा जप्त

नगर: प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दत्तात्रय राठोड यांच्या विशेष पथकाने शुक्रवार केलेल्या कारवाईत काळ्याबाजारात  विक्रीसाठी चाललेला रेशनिंगचा 14 टन गहू व दहा टन तांदळाचा साठा जप्त केला. हा जप्त केलेला साठा राहुरी तालुक्यातील कोल्हार येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा असल्याचे समजते.
प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.राठोड यांनी अवैध धंद्या विरुद्ध मोहीम उघडली असून जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी त्यांचे पथके छापा टाकून अवैध धंदे वाल्यांचे मुसक्या आवळण्याचा  प्रयत्न  करत आहेत. 
त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी त्यांच्या पथकाने नगर-पुणे राज्यमार्गावर चास गावाच्या शिवारात मालट्रक क्रमांक एम एच 18 ए पी 9099 शासकीय रेसिंगचा सुमारे 14 टन गहू व दहा टन तांदूळ ट्रक्स सुमारे 20 लाख रुपये किमतीचा रेशनिंग माल काळ्या बाजारात  विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला. ट्रक चालक दादासाहेब बाबासाहेब गाजरे वय 32 राहणार चिंचोली फाटा तालुका राहुरी या पोलिसांनी ताब्यात घेतले असून नगर तालुक्याचे तहसीलदार यांना याबाबत पोलिसांनी पत्र दिले आहे ट्रक चालकाविरुद्ध शुक्रवारी कारवाई करण्यात आली. दरम्यान ट्रक चालकाकडे पशुखाद्य असल्याच्या पावत्या मिळून आल्या.  मात्र गाडीमध्ये तर रेशनचा गहू व तांदूळ असल्याचे आढळले. 

2 COMMENTS

  1. Im no longer sure where you are getting your info, but good topic. I needs to spend some time studying much more or working out more. Thanks for great information I was on the lookout for this information for my mission.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here