व्हाट्सअप वापरताय वाचा कशासाठी मोजावे लागतील पैसे

नवी दिल्ली- लॉकडाउनच्या काळात लोकांना सोशल मीडियाचा वापर सहज वाटू लागला होता . त्यातच व्हाट्सअप हे मेसेज पाठवणारे ॲप करोडो लोकांचे लोकप्रिय आहे. परंतु आता फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप युज करणाऱ्यांना पैसे द्यावे लागू शकतात. कंपनीने आपल्या ब्लॉगवर या पोस्ट संबंधीची माहिती दिली आहे. पण व्हाट्सअप युजर्सना नाही म्हणजेच केवळ मेसेज टाकतात त्यांना नव्हे तर व्हाट्सअप बिझनेस युजर्सना यासाठी चार्ज करावा लागणार आहे.

जर कोणी व्हाट्सअप बिझनेस यूजर असेल तर त्यांच्या काही सेवांचा लाभ घेण्यासाठी पैसे मोजावे लागतील पूर्ण जगभरात पाच कोटी पेक्षा जास्त लोक व्हॉट्सऍप बिजनेस यूजर्स आहेत. व्हाट्सअप कंपनीने ती घोषणा आपल्या ब्लॉगवर केली आहे हॉर्स मध्ये असं म्हणण्यात आले आमच्या बिजनेस ग्राहकांना काही सेवांसाठी चार्ज करणार आहोत असे असले तरी ते मात्र जाहीर करण्यात आलेली नाही

व्हॉट्सऍपचं म्हणणं आहे की, यूझर्संना चार्च केल्याने ते अधिक चांगली सेवा देऊ शकतील. व्हॉट्ऍपच्या सर्वसाधारण यूझर्संना या ऍपच्या वापरासाठी कोणतेही बदल करण्यात आलेली नाहीत. यूझर्स पूर्वीप्रमाणे मेसेजिंग करु शकतील. असे असले तरी येत्या काही दिवसात कंपनी ऍपवर काही जाहिराती दाखऊ शकते. कंपनी यावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. ऍपच्या स्टेट्स सेक्शनमध्ये यूझर्संना जाहिरात पाहायला मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here