मंत्री गडाख यांच्या हस्ते शिवशंभू अॅग्रो सर्विसेस या भव्य कृषी दालनाचे उदघाटन

राष्ट्र सह्याद्री :प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर

हंडी निमगाव :

नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील सरपंच पांडुरंग उभेदळ तसेच त्यांचे बंधू स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष सुरेशराव उभेदळ यांच्या नव्याने सुरुवात करत असलेल्या शिवशंभू ऍग्रो सर्व्हिसेस या भव्यदिव्य कृषी दालनाचे दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री ना.शंकररावजी गडाख यांच्या उपस्थित
आणि मुकिंदपुर येथील श्रीराम साधना आश्रमाचे ह.भ.प.सुनील गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा.आ.पांडुरंग अभंग साहेब,हभप आराध्य महाराज,पं.स.सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,काकासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रमुख पाहुण्याचा सत्कार यावेळी अमृत सुरेशराव उभेदळ,आणि विकास पांडुरंग उभेदळ यांनी केला.
उभेदळ कुटुंब आत्तापर्यत खूप कष्टाने इथं वर आले असून, त्यांचा भविष्यकाळ निश्चित सुजलाम सुफलाम् असेल असे उद्घाटना प्रसंगी नामदार गडाख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here