पुणतांब्यात बळीराजाचा क्रांतीकारी पाऊल

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

पुणतांबा : राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या पुणतांबा गावाची वेगवेगळ्या कारणामुळे राज्याच्या नकाशावर आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा येथील ग्रामस्थांचा नेहमीच प्रयत्न असतो. देशाला शेतकरी संपाचे आंदोलनाचे नवीन अस्त्र पुणतांबा येथील बळीराजानेच दिले होते. शेती आणि शेतकरी हा विषय दिवसेंदिवस अत्यंत गुंतागुंतीचा होत आहे. शेती परवडत नसली, तरी शेतकऱ्यांनी शेती करणेही सोडून दिले नाही. शेतीत नवनवीन प्रयोग करून तसेच शेतीला जोड धंदा सुरु करून शेतकरी वर्गाने संघर्ष सुरू ठेवला आहे.
येथील पुरणगाव रोडवर राहणारे गोविंद धनवटे यांनी तर शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय गेल्या ८ वर्षापासून सुरु केला आहे.

अवधे दहावीचे शिक्षण घेतलेले असलेले धनवटे यांनी पोल्ट्रीच्या माध्यमातून पक्षी व त्यांचे खाद्य विकणे कोंबडीच्या विविध प्रकारच्या प्रजाती उपलब्ध करून योग्य विपणनाच्या माध्यमातून व्यवसायात चांगलाच जम बसविला, मात्र पोल्ट्री फॉर्मला जोडूनच चिकन व्यवसाय सुरु करता येईल का ? याची त्यांनी चाचपणी केली, चिकन व मटन व्यवसाय करणारा समाजात ठराविक वर्ग आहे.

बळीराजाने या व्यवसायात पदार्पण केले. तर समाज काय म्हणेल याचा विचार न करता धनवटे यांनी पुणतांबा येथील कोपरगाव रोड लगत एक गाळा भाडोत्री घेऊन ‘बळीराजाचिकन’ यानावाने विजयादशमीच्या मुहूर्तावर दुकान सुरु करून क्रांतीकारी व धाडसी पाऊल टाकले आहे. एका बळीराजाने दसरा सणाच्या निमित्ताने व्यवसाया बाबत केलेले सिमोल्लंघनच म्हणावे लागेल, व्यवसायात असलेली स्पर्धा विचारात घेऊन त्यांनी घाऊन पध्दतीने व्यवसाय करण्याचा निर्धार व्यक्त केला. धनवटे यांनी सुरू केलेल्या व्यवसायाची पुणतांबा पंचक्रोशीत सकाळपासूनच चर्चा सुरु झाली, बळीराजाने आता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे हा त्यांनी कृतीतून दिलेला संदेश बळीराजाची परवड थांबवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here