श्रीरामपूरात रावण दहन कार्यक्रम उत्साहात साजरा

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

श्रीरामपूर – येथील परिवर्तन समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून शहराची धार्मिक परंपरा कायम रहावी म्हणून छत्रपती राजे संभाजी चौकात याही वर्षी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात सामाजिक अंतर ठेवून नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कामगार नेते नागेश सावंत शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडधे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, अर्चना पानसरे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमा प्रसंगी माजी नगरसेवक संजय छल्लारे, ऋषिकेश लांडे, रुपेश हरकल, योगेश ओझा, प्रसाद बिल्डीकर,कुणाल करंडे, जयश्री नवले, जयश्री जगताप, पत्रकार सलीम पठाण, ऋषिकेश डावखर, आधी रावण दहनाचा कार्यक्रम उपस्थित होते रावणावर लिहिलेले "आणून पस्तावा" या वाक्याने शहरात राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खमंग चर्चा सुरू होती, सत्ताधारी विरोधक हे एकमेकांकडे बोट दाखवून खदाखदा हसत होते.

याठिकाणी पोलिसांनी रावण धनाच्या चारही बाजूस बॅरिकेट्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता. डीवायएसपी राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व इतर पोलिस कर्मचारी यांच्यासह नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी जाधव, अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, व इतर कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख बंदोबस्त ठेवला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here