अजित पवारांना कोरोनाची लागण: ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात करण्याचा फैलाव वाढत आहे. अजित पवार यांना सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे. त्यांना थकवा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी स्वतःला होम कोरोन्टीन करून घेतले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रूग्णालयात दाखल झाले.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तळागाळातून काम करणाऱ्या लोकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. अगदी कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते ग्राऊंड लेव्हलला काम करत होते. त्यांनी नुकताच अतिवृष्टीचा फटका बसलेल्या काही भागांचीही पाहणी केली. या काळात खबरदारी म्हणून त्यांनी करोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र, डॉक्टरांनी सांगितल्यामुळे ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आले नाही.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here