Racism: बिर्ला कुटुंबीयांनी घेतला अमेरिकेतील वर्णद्वेषाचा अनुभव… अमेरिकेतल्या हॉटेलने अक्षरशः हाकलून दिले

मुंबई: प्रतिथयश उद्योजक आदित्य बिर्ला यांच्या कुटुंबियांना अमेरिकेत वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले. त्यांची कन्या अनन्या बिर्ला यांनी त्यांना आलेल्या वर्णभेदाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. आम्हाला अमेरिकेतल्या हॉटेलने अक्षरशः हाकलून दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इटालियन रुट्स या रेस्टोरंटने मला आणि माझ्या कुटुंबीयांना आपल्या परिसरातून हाकलून दिले. हा वर्णभेद अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना व्यक्त करताना ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी अमेरिकेतील संबंधित रेस्टोरंटला दिला आहे.”मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्यांनी त्या रेस्तराँच्या परिसरातही थांबू दिलं नाही. आम्हाला सगळ्यांना जेवण करण्यासाठी तीन तास ताटकळत रहावं लागलं. तरीही आम्ही रेस्तराँमध्ये थांबलो होतो.” नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटर आर्यमान बिर्ला यांनीही याप्रकरणी ट्विट करत अत्यंत वाईट अनुभव आल्याचं म्हटलं आहे. बिर्ला कुटुंबीयांचं हे ट्विट आज दिवसभर सोशल मीडिया चर्चेच्या केंद्रस्थानी होते. 

2 COMMENTS

Leave a Reply to Hmrpwb Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here