Crime: गॅंगवाडी नजीक युवकाचा खून; गुन्हेगारी पार्श्वभूमी कारणीभूत?

बेळगाव / प्रतिनिधी

आझमनगर येथील युवकाचा खून करण्यात आला आहे. येथील गॅंगवाडी नजीक ही घटना घडली आहे. शहबाज असे या युवकाचे नाव आहे त्याच्यावर खुनासह अनेक गुन्हे आहेत, रविवारी रात्री अकराच्या सुमारास धारदार शस्त्रास्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले आहेत यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता. सदर युवक गुंड प्रवृत्तीचा असून या खुनामागे जुना द्वेष असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान या हल्ल्याचा तपास माळ मारुती पोलीसाद्वारे सुरू असून मुत्या नटी येथील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. युवकांवर हल्ला करून त्याला गंभीर रित्या जखमी करण्यात आले होते. उपचारासाठी त्याला बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र तर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती समजताच शेकडो युवकांनी जिल्हा इस्पितळ समोर धाव घेतली यामुळे इस्पितळात समोर काही वेळ तणाव निर्माण झाला होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जिल्हा इस्पितळात घेऊन घटनेची माहिती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here