10 कोटी देणारा तलाव वाहू लागला


राष्ट्र सह्याद्रि / प्रतिनिधी
दौंड : अंदाजे 10 कोटी उत्पन्न देणारा आणि माती  मुरुम आणि वाळू उखनन करून विद्रुप आणि उध्वस्त केलेला तलाव गेल्या कित्येक वर्षानंतर प्रथमच तुडुंब भरून वाहू लागल्याने सर्व सामान्य गावकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.
दौंड तालुक्यातील कासुरडी येथील अंदाजे 35  हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला हा तलाव गेल्या अनेक वर्षात येथील उचापत खोर लोकांनी आपल्या समांतर उत्पन्नाचे साधन म्हणून काही वर्षांपूर्वी येथे तलावातील गाळ ( माती ) उखनन करण्यास सुरुवात केली. शेतीस कसदार पिक आणि पीक उत्पन्न वाढण्यास उपयुक्त गाळ माती लोक या तस्करकडून विकत नेऊ लागले. रोजचे 100 ट्रॅकटर ते 50 ट्रक विक्री होऊ लागली. त्यातच गाळ माती शेतकऱ्यांनी मोफत स्वखर्चाने लागेल त्याने न्यावी, असे धोरण आले तरी तलावाचे मालक झालेले लोक पैसे घेऊनच माती विकू लागले. तीन चार वर्षांनी माती सम्पली, मुरुम लागला, पुन्हा उत्पन्न सुरू झाले, मुरुम सपमल्यावर वाळू लागली आणि मग तस्कर कोट्याधीश झाले. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ यामधून तस्करांचे फावले. इकडे तलाव उघडा बोडका झाला. नंतर शासनाने तस्कर लोकांच्या मुसक्या आवळल्या,
उखनन बंद झाले.
सध्या चालू असलेल्या जोरदार पाऊसामुळे गेल्या कित्येक वर्षांनंतर तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी निसर्ग रम्य तलाव असून, येथे स्थळ विकसित करण्यात आणि वृक्ष सम्पदा वाढवण्यास वाव आहे. यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here