देश-विदेश- ब्रँड व्हॅल्यू नुसार बिग बी ठरले आदरणीय सेलिब्रिटी

ब्रँड म्हणजे सेलिब्रिटी त्यांचा व्यवहार, सोशल मीडियावर त्यांची प्रतिमा या सगळ्या गोष्टी धरून त्यांचा ‘ब्रँड व्हॅल्यू’ ठरवला जातो. जपानमधील रकुटेन या एजन्सीने नुकतेच एक सर्वेक्षण करून त्यात विविध सेलिब्रिटीज त्यांच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ नुसार किताब दिला आहे. या केलेल्या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सर्वात आदरणीय तसेच विश्वसनीय सेलेब्रिटी ठरले आहेत. तर भारतात ज्या सेलिब्रिटी ला सर्वाधिक ओळख प्राप्त झाली आहे, त्यात आयुष्यमान खुराणा यांचे नाव समोर आले आहे. तसेच अभिनेत्री आलिया भट्ट ही सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी ठरली आहे. फक्त सिनेमाच नाही तर क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचाही या यादीत समावेश आहे.

त्याच्या मागोमाग विकी कौशल आणि कतरिना कैफचा क्रमांक आहे. सर्वांत वादग्रस्त सेलिब्रिटी कपल ठरलंय आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सर्वांत वादग्रस्त सेलिब्रिटी ठरला आहे.

२३ शहरांतील ६० हजार जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. एकूण १८० सेलिब्रिटींना विविध किताब त्यात देण्यात आले. त्यातील निवडक यादी खाली दिली आहे.

India’s Most Respected: अमिताभ बच्चन

Celebrity India Identifies with the most: आयुषमान खुराना

India’s Most Appealing: अक्षय कुमार

India’s Most Controversial: हार्दिक पांड्या

India’s Most Attractive: आलिया भट्ट

India’s Most Trendy: विराट कोहली

India’s Most Beautiful: दीपिका पदुकोण

India’s Most Versatile: नवाजुद्दीन सिद्दीकी

India’s No 1 Heartthrob: रणबीर कपूर

India’s Most Seductive: राधिका आपटे

India’s Most Sexy: प्रियांका चोप्रा

India’s Most Down to Earth: महेंद्रसिंह धोनी

India’s Most Reliable: सायना नेहवाल

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here