अल्पवयीन मुलीचा अपहरण आणि विनयभंग: तिघांवर गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा प्रतिनिधी,
  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याची घटना येथे घडली. त्यानुसार राहूरी पोलीस ठाण्यात तीन जणांवर अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         देवळाली प्रवरा येथील ११ वीत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी ही  दिनांक २४ ऑक्टोबर रोजी देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजार असल्याने भाजीपाला आणण्यासाठी दुपारी दिड वाजे दरम्यान घरातून बाहेर पडली होती. रस्त्यात आरोपी अनिता पारखे ही सदर मुलीला भेटली. पाच मिनिटांकरिता घरी चल अशी म्हणाली त्यावर सदर मुलीने नकार दिल्या तर अनिता पारखे हिने तिला जबरदस्तीने तिच्या घरी नेले. थोडावेळ थांबल्यानंतर सदर मुलगी तेथून निघाली. यावेळी आरोपी विकास पारखे याने त्याची मोटरसायकल चालू केली आणि तू गाडीवर बस तूला बाजारात सोडतो. आईपण येणार आहे, असे म्हणाला. सदर मुलगी गाडीवर बसताच विकासने गाडी जोरात चालवली. मध्ये कुठेच न थांबता सरळ गुहा येथील सतिष गायकवाड या मित्राच्या घरी घेऊन गेला. मला घरी जायचे आहे. असे म्हणून सदर मुलगी रडू लागली. विकासने तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून गाडी नगरच्या दिशेने चालवली. मला तूझ्या सोबत लग्न करायचे आहे. असे म्हणून त्याच्या जवळील चाकू दाखवून दम दिला. तोपर्यंत ते नगर येथील झोपडी कॅन्टींग पर्यंत पोहचले. तेथे चाकूचा धाक दाखवून कोठे काही बोललीस तर तूला ठार मारीन असा दम दिला. आणि सदर मुलीला तिथेच सोडून तो निघून गेला.
        यावेळी पिडीत मुलीला तिच्या घरच्या लोकांचा फोन आला. आणि पिडीत मुलीने घडलेला प्रकार सांगितला. नंतर तिच्या चुलत भावाने तिला नगर येथून घरी आणले. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत विकास सुनिल पारखे, अनिता सुनिल पारखे व आकाश सुनिल पारखे या तिघांविरुद्ध अपहरण व विनयभंग अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय पठारे हे करीत आहेत.

4 COMMENTS

  1. You actually make it seem so easy with your presentation however I in finding this matter to be really something that I think I’d by no means understand. It kind of feels too complex and very large for me. I am looking forward for your subsequent post, I’ll attempt to get the grasp of it!

  2. The following time I read a weblog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I imply, I know it was my choice to learn, but I truly thought youd have something interesting to say. All I hear is a bunch of whining about one thing that you may repair in the event you werent too busy looking for attention.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here