पेन्शनधारकांची यंदा दिवाळी गोड होण्याची शक्यता : बुधवारी महत्वपूर्ण बैठक

श्रीरामपूर : गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेला देशातील ६२ लाख पेंशनरांचा पेन्शनवाढीचा प्रश्न दिवाळीपूर्वी मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या संदर्भात बुधवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे, अशी आनंदाची बातमी भविष्य निर्वाहनिधी सूत्रांकडून मिळते आहे, अशी माहिती इपीएस ९५ पेन्शनर्स राष्ट्रीय संघर्ष समिती राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर व बी.आर.चेडे यांनी दिली.
    पेन्शनवाढ होण्यासाठी देशातील विविध संघटनानी आंदोलने केली. रा.संघर्ष समिती, पेन्शनर्स कोओर्डीनेशन कमिटी,सर्व श्रमिक कामगार संघ,आदींनी गेल्या महिन्यात प्रत्येक खासदाराना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक खासदाराने निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती, यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांच्या नेतृत्वाखाली खा.हेमा मालिनी समवेत शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले, त्याचवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाले होते. परंतु कोरोना, सीमाप्रश्न आदीमुळे विलंब लागला होता.इपीएफओचं अंतर्गत येणाऱ्या संघटीत क्षेत्रातल्या कंपन्यांना त्यांच्या कामगारांना इपीएफचा लाभ द्यायचा असतो. इपीएफ मध्ये कर्मचारी व कंपनीचे योगदान बेसिक पगार अधिक डी.ए च्या १२.१२ टक्के इतके असते. यापैकी कंपनीच्या १२ टक्के योगदानातील ८.३३ टक्के रक्कम इपीएस योजनेत जाते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रोव्हीडेंट जास्त व्याज देण्याची व इम्प्लोयी पेन्शन फंडच्या अंतर्गत दरमहा रु ५०००/-पेन्शनवाढ करण्याची तयारी सुरु आहे.

या दोन्ही विषयावर लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात स्थापन केलेल्या समितीची अतिशय महत्वाची बैठक बुधवारी होणार आहे. त्यामध्ये इपीएफओ अंतर्गत येणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन व गुंतवणुकीवर चर्चा होईल. इपीएस कर्मचारी यांना अधिक फायदेशीर कसे करता येईल याचा विचार सुरु आहे. या समितीची स्थापना सहा महिन्यापूर्वी झाली आहे. कोरोना संकट व लॉकडाऊन यामुळे होणारा परिणाम याचा आढावा घेतला जाईल. मृत्युनंतर वारसास लवकर पेन्शन दिली जाईल. नेमलेली समिती चर्चेनंतर आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करेल. या समिती सदस्यां देशातील संघटीत व असंघटीत क्षेत्रातल्या कामगारासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती कामगार मंत्रालयाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here