दौंड मधील अतिवृष्टी, नुकसान भरपाई मिळावी: आ. कुल,

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

दौंड : दौंड मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी दौडचे आ. राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी पुणे यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
दौंड तालुक्यात दि, 14 ते 17 ऑक्टोंबर  दरम्यान सुमारे 185 मी.मी इतका उचांकी पाऊस पडला आहे. जवळ जवळ अतिवृष्टी  होऊन  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ओढे – नाले  तुडुंब वाहिल्याने शेतात पाणी घुसुन ऊस, भुसार पिके, कांदा या  पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लहान मोठे बंधारे तलाव फुटून वाहिल्याने नागरिकांच्या घरात पानी घुसल्याने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. या पुरात गाई, म्हशी, बैल शेळ्या वाहून गेल्याने पशुधनाची मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकरी आणि नागरिकाना नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी आ. राहुल कुल यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांची भेट घेऊन केली आहे.
त्याच प्रमाणे दौंड मधील पश्चिम भागातील बरीच गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये समावेश झालेला असून या गावांचे विकास काम ठप्प झाल्याने या गावांचा विकास कामे त्वरित करण्यात यावीत. यासाठी प्राधिकरण आयुक्त ( आय,एस, आय, ) , सुहास दिवसे यांची आ. राहुल कुल यांनी भेट घेऊन मागाणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here