करिष्मा च्या घरी एनसीबीचा छापा: मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला आहे. छापेमारी दरम्यान करिश्माच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने करिश्मा प्रकाशला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु एनसीबी कडून करिश्मा प्रकाश यांना अटक करण्यात आली नाही.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाच्या प्रकरणात चौकशीदरम्यान अनेक पॅडलर्सकडून करिश्मा प्रकाशचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर आज एनसीबीने करिश्माच्या घरी छापा टाकला. अटक केलेल्या पॅडलर्सशी केलेल्या चौकशीत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एनसीबीला कळले की करिश्मा प्रकाश या ड्रग्ज पॅडलर्सच्या नियमित संपर्कात होती.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here