मुख्यमंत्री ग्रामसडक सडक योजने अंतर्गत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी निधी मंजूर : संदीप नागवडे

श्रीगोंदा:  विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती  श्रीगोंदा भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नामुळे मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी  १६५३.९१ लक्ष  रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्यांची कामे सुरु होणार असल्याची माहिती  तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
 तसेच या रस्त्यांच्या नियमित देखभाल दुरुस्तीसाठी ही  ५ वर्षेपर्यंत ची निधीची तरतूद करून ठेवलेली आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार बबनराव पाचपुते हे सतत प्रयत्न करून निधी आणण्याचे काम करत आहेत त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या वैभवात भर पडणार आहे.सौर ऊर्जा प्रकल्पाची अनेक कामे मंजूर झालेली असून उर्वरित कामासांठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत. तसेच डिंभे ते माणिकडोह बोगद्यासाठी हि आमदार पाचपुते यांचा शासन दरबारी प्रयत्न सुरु असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here