लॉजवर पोलिसांचा छापा : ३ महिलांची सुटका

राष्ट्र सह्याद्री  / प्रतिनिधी
दौंड :  पुणे सोलापूर हंम रस्त्यावरील कुरकुंभ येथील अनुराधा लॉजवर दौंड पोलिसांनी छापा टाकून 3 महिलांची सुटका केली, तर 2 व्यक्तींना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील  अनुराधा लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची खबर दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक याना मिळाली.  याची खात्री केल्यावर महाडिक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या लॉजवर छापा टाकला. यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली.
यामधील दोन महिला  बंगाली तर एक महाराष्ट्रीयन आहे. सदर लॉज चालवणारे दिवाकर मथु रेड्डी वय 34 आणि डायसन डेनिस डिसोझा वय 27 दोघेही  रा, उडपी कर्नाटक राज्य याना अटक करण्यात आली आहे. 
दौंडचे उप विभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांचे नेतृत्वाखाली पो, नि, सुनील महाडिक यांनी ही कारवाई केली.  यामध्ये पोलिस कर्मचारी  हेमलता सूर्यवंशी, अमोल गवळी, सचिन बोराडे, धनंजय गावडे, अक्षय घोडके, सुनील सस्ते, रवींद्र काळे, राजू शिंदे यांनी भाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक  सुनील महाडिक करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here