माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीला देशद्रोही घोषीत करा

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

कोपरगाव: जम्मु काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री व वादग्रस्त नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी नुकतेच “जोपर्यंत जम्मु काश्मीर मध्ये ३७० वे कलम रद्द होत नाही तोपर्यंत भारताचा तिरंगा ध्वज फडकविणार नाही” असे राष्ट्रविरोधी विधान करून या देशाचा व या देशातील घटनेचा अपमान केलेला आहे.

अशा राष्ट्रद्रोही विधान करणाऱ्या मुफ्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच कठोर कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव शहर भाजपा (वसंत स्मृतीच्या) वतीने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

त्याबाबतचे निवेदन नुकतेच कोपरगावचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरला जे विशेषाधिकार देण्यात आले होते ते रद्द करण्याचा निर्णय फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन, महम्मद युसूफ तारिगामी आदी नेत्यांना मान्य नाही.

भारत सरकारने ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ ही कलमे पुन्हा लागू करावीत. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या नेत्यांकडून जनआघाडी स्थापना करण्यात आली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी “काश्मीरला पुन्हा पूर्वीचा दर्जा प्राप्त होईपर्यंत तिरंगा ध्वज हाती घेणार नाही” असे जे वादग्रस्त व देशद्रोही वक्तव्य केले त्याचा सर्वस्तरांतून निषेध केला जात आहे. मेहबुबा मुफ्ती यांचे वडील या देशाचे गृहमंत्री होते. त्यांची कन्या इतके टोकाचे देशद्रोही वक्तव्य करते. याचा अर्थ ते या भारताशी एकरूप होण्यास तयार नाहीत असाच घ्यायला हवा.

जोपर्यंत हाती सत्ता तोपर्यंत त्या सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि सत्ता हातची गेली की, शेजारच्या देशांच्या मदतीने फुटीरतावादी शक्तींना बळ मिळेल, अशा कारवाया करायच्या. हे आता नेहमीचे घडून येत आहे. त्याबाबत देशभरात निषेध होत आहे.को परगाव शहरही त्याला अपवाद नाही येथील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी नुकतेच कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करून त्यांच्या देशविरोधी विधनाबद्दल कारवाईची मागणी केली आहे.

यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे, माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड, चेतन खुबाणी, माजी नगरसेवक संजय कांबळे, किरण थोरात, विनीत वाडेकर, योगेश वाणी, प्रमोद पाटील आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here