मराठा आरक्षणा’प्रश्नी’ छावा आक्रमक, अन्यथा ‘ हाती ‘ तलवारी घेऊ : जावळे

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

श्रीरामपूर : मराठा समाजाचे ढीगभर नेते असतानाच आरक्षणाचा मुद्दा लांबणीस ठेवला. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा गांभिर्याने विचार न केल्यास तलवारी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.

नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात 21 ठिकाणी छावा शाखा उद्घाटन केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहवर जावळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा आरक्षणासाठी छावाचे कार्यकर्ते लढा देत आहे, मराठा समाजावर कायमच अन्याय झाला आहे, राजकीय पुढाऱ्यांनी मराठा समाजाचा मतांपुरता वापर करून मराठा आरक्षणाचा मुद्दा झुलता ठेवला”, असा आरोप त्यांनी केला. यावेळी भिमराव मराठे, विजय घाडगे, पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, शिवश्री लांबे, अॅड सुभाष जंगले यांच्यासह छावाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जावळे म्हणाले, आरक्षणासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी रक्त सांडले. आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कोपर्डी प्रकरणातच लांखाचे मोर्चे निघाले, त्यातही सरकारने वेळ काढूपणा केला. दहा दिवसांच्या आत राज्य सरकारने आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा अन्यथा तलवारी हाती घेऊ, गेल्या सरकारने दिलेले आरक्षण टिकले नाही, हे सरकार या प्रश्नावर गंभीर नाही, असा आरोप करताना ‘त्या’ आवलादी मराठ्यांच्या राहिल्यात नाहीत, अशी टीका त्यांनी उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण व इतर मराठा नेत्यांवर केली.
राजकारणात मराठा समाजचा फक्त वापर करून घेतला जात आहे, मराठा समाजाच्या तरुणांवर अन्याय झाला. 400 कोटीचा राज्य सरकारने निधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला दिला असताना,
मराठा समाजाच्या तरुणांनाचे प्रकरणे प्रलंबित पडत आहेत.

ही प्रकरणे तातडीने मंजूर करून मराठा समाजाच्या तरूणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली, शिवाजी महाराजांचे स्मारक, राम मंदिराचा निर्णय घेतला असताना महाराजांच्या स्मारकाविषयी राज्य सरकारने मार्ग काढून निर्णय घेण्यात यावा. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 50 हजाराची भरपाई शेतकर्‍यांना मिळावी, या प्रमुख मागण्या राज्य सरकारने दिवाळी पूर्वीच पुर्ण कराव्यात, अशी मागणी जावळे यांनी केली. यावेळी छावाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here