मुंबईतील सिटी मॉल पाठोपाठ पुण्यातील हडपसर मध्येही आगीचे तांडव

पुणे : मुंबईतील सिटी मॉलची घटना अजूनही ताजी असतानाच आता पुण्यातील हडपसर परिसरात रात्री उशिरा एका गोडाऊनमध्ये आग लागली. हे गोडाऊन पुठ्ठ्याचं असल्याने आग अजूनच पसरली. या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीनं काही क्षणात रौद्र रूप धारण केलं. अख्खं गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी होतं. आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

पुण्यातील हडपसर गाव, राम मंदिर जवळ ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर युद्धपातळीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

मात्र गोडाऊनमध्ये पुठ्ठे आणि कागद असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरत होती.

साधारण तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. पुठ्ठ्यामुळे ही आग वेगानं पसरली. आगीमुळे परिसरात धुराचे उंच दाट लोळ उठले होते, तर आगीच्या ज्वाला लांबपर्यंत दिसत होत्या. यामुळे परिसरात राहणाऱ्याची झोप उडाली. पुठ्ठ्याच्या गोडाऊनमधे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here