Accident: ट्रॅक्टर – टेम्पो अपघातात एक ठार चार जखमी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव _ सांगली राज्य महामार्गावरील कागवाड _ शिरगुप्पी नजीक ट्रॅक्टर व आयशर टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला आहे, तर महाराष्ट्रातील चौघे ऊस तोड कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात आयशर टेम्पो चालक परशुराम मारुती पाटील (वय 34, रा. नरवाड, ता. मिरज) हा जागीच ठार झाला आहे.

अपघातातील जखमी ऊसतोड कामगारांना मिरज येथील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बेळगाव सांगली राज्य महामार्गावर आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर मध्ये समोरासमोर धडक बसली याच वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या बोलेरो जीप तसेच दुचाकीला देखील या वाहनांची धडक बसली. या अपघातात बेळगावहून कागवाड कडे येणारा आयशर टेम्पो आणि कागवाड येथून ऊसतोड मजुरांना घेऊन शिरगुप्पी ला जाणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक बसली.

कागवाड चे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत धर्मटी आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर जखमी कामगारांना मिरज येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here